दसरा मेळावा कुणाचा?


22/09/2022 15:32:35 PM   Sweta Mitra         3


दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवर कोणाला परवानगी मिळणार याचा पेच कायम होता. अखेर महानगरपालिकेने शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांना परवानगी अखेर नाकारली आहे. मुंबई महानगरपालिकेने दोन्ही गटांना एक पत्र दिले आहे. मुंबई महापालिकेने परवानगी नाकारल्यानंतर आता शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याचा फैसला हायकोर्टात होणार आहे. शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यावर आज हायकोर्टात सुनावणी पार पडणार आहे. सुधारीत याचिका दाखल करण्यासाठी ठाकरे गटाने कोर्टाला वेळ वाढून मागितली होती. त्यानंतर आज दुपारी अडीच वाजेपर्यंत सुधारित याचिकेसाठी कोर्टाने वेळ वाढून दिला आहे. शिवसेना कोर्टात नव्याने सुधारित याचिका दाखल करणार आहे. गणेशोत्सवाच्या आधीपासून शिवसेनेने परवानगीसाठी बीएमसीकडे अर्ज केला होता. मात्र, त्यावर रितसर परवानगी मागूनही चालढकल केल्याने शिवसेनेने हायकोर्टात धाव घेतली आहे. आज त्यांच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे.
also read:
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  TAGS :              maharastra shinde thackery rival Dussehra Mela