SAIL मध्ये मोठी भरती


22/09/2022 16:15:00 PM   Sweta Mitra         5


अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये 333 जागांसाठी भरती सुरू आहे. स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि.मध्ये एक्झिक्युटिव्ह - असिस्टंट मॅनेजर (सेफ्टी), नॉन-एक्झिक्युटिव्ह - ऑपरेटर कम टेक्निशियन (बॉयलर ऑपरेटर), माइनिंग फोरमन, सर्व्हेअर, माइनिंग मेट, फायर ऑपरेटर (ट्रेनी), फायरमन-कम-फायर इंजिन ड्राइव्हर (ट्रेनी) या पदांसाठी भरती करण्यात येत आहे. या पदांवर अर्ज करू इच्छिणाऱ्या पात्र उमेदवारांनी www.sail.co.in या वेबसाईटवर गेल्यावर ऑनलाईन पध्दतीने अर्ज करायचा आहे.
also read:
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  TAGS :              Big recruitment job applications candidates SAIL