कर्मवीर भाऊराव पाटील जयंती


22/09/2022 16:22:10 PM   Sweta Mitra         4


कर्मवीर भाऊराव पाटील यांंची आज (22 सप्टेंबर 2022 रोजी) जयंंती आहे.  1887 मध्ये 22 सप्टेंबर रोजी त्यांंचा जन्म झाला होता, त्यांंचे मुळ कर्नाटक राज्यात दक्षिण कन्नड जिल्यातील मूडब्रिदी येथे आहे मात्र त्यांंचे पुर्वज कामानिमित्त महाराष्ट्रात सांंगली व नंंतर कोल्हापुर येथे स्थिर झाले होते, कोल्हापुरातील हातकणंंगले तालुक्यातील कुंभोज या गावात भाऊराव यांंचा जन्म झाला होता. खरं पाहायचं तर भाऊराव हे अत्यंत कर्मठ घराण्यातील होते मात्र त्यांंचा मुळ स्वभाव बंडखोर आणि बेधडक असल्याने त्यांंनी आपले आयुष्य जात न पाळता लहानपणापासुनच असपृश्यांंसोबत आणि त्यांंच्यासाठी खर्ची घातले होते, त्यांंच्यावर राजर्षी शाहु महाराज यांंच्या कामाचा प्रभाव होता. भाऊरावांंनी दलित व अस्पृश्यांंच्या शिक्षणासाठी महत्वपुर्ण काम केले होते, कमवा आणि शिका योजना तसेच रयत शिक्षण संस्था ही त्याच कामाची उदाहरणे आहेत.
also read:
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  TAGS :              Karmaveer Bhaurao Patil birth anniversary pray soul