भाजपाचे मिशन बारामती स्टार्ट


22/09/2022 16:24:43 PM   Sweta Mitra         5


आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने भाजपने पुणे जिल्ह्यावर लक्ष केंद्रीत केलं आहे. त्यातच बारामती लोकसभा मतदार संघावर संपूर्ण शक्ती पणाला लावण्याची जोरदार तयारी भाजपने केल्याचं दिसून येतंय. या मिशन  बारामतीची आजपासून सुरुवात होतेय, असं म्हटलं जातंय. कारण देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज पुणे दौऱ्यावर आहेत. गेल्या काही दिवसांपासून अर्थमंत्र्यांच्या बारामती दौऱ्याची चर्चा सुरु होती. आज अखेर त्या पुण्यात दाखल होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात निर्मला सीतारमण यांचा तीन दिवस दौरा आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक तसेच संघटनात्मक आढावा यावेळी घेतला जाईल. अर्थमंत्री या भूमिकेतून त्या कोणत्या मोठ्या घोषणा करणार, याकडेही सर्वांचं लक्ष लागलंय.  गेल्या अनेक वर्षांपासून  बारमतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा, पवार घराण्याचा दबदबा आहे. शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे इथे खासदार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत त्यानाच तगडं आव्हान देण्यासाठी भाजपने सर्वशक्ती पणाला लावली आहे.
also read:
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  TAGS :              BJP Mission Baramati Start party