राज्यात आजपासून शाळा सुरू


24/01/2022 16:00:00 PM   Sweta Mitra         73


राज्यात आजपासून काही ठिकाणी शाळा सुरू होत आहेत. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे शाळा बंद ठेवण्यात आल्याने मुलांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते. त्यामुळे राज्य शासनाने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. राज्यात आज बालवाडी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरु झाल्या आहे. दरम्यान राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे पालकांमध्ये काहीशी भीती आहे. या चिंतेमुळे काही जिल्ह्यांमध्ये शाळा सुरू करण्यात आल्या नाहीत.
also read:
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  TAGS :              education school maharastra mumbai