लहान मुलांच्या आयसीयूला आग


25/09/2022 18:21:35 PM   Sweta Mitra         21


अमरावती शहरातील जिल्हा महिला रुग्णालयात आग लागल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या अपघातात कोणाचाही मृत्यू झाला नाही. मात्र, मुलांच्या अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत दोन मुले किरकोळ जखमी झाली. जखमींना तातडीने पंजाबराव देशमुख रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील जिल्हा महिला रुग्णालयातील बाल अतिदक्षता विभागात पहाटेच्या सुमारास अचानक आग लागली. या घटनेने रुग्णालय परिसरात एकच खळबळ उडाली. आगीची माहिती मिळताच रूग्णालयातील कर्मचार्‍यांसह रूग्णाचे नातेवाईकही धावले आणि मुलांना तातडीने दुसर्‍या वॉर्डात नेण्यात आले. यावेळी दोन मुले किरकोळ जखमी झाली.
रुग्णालयातील आगीमुळे काही मुलांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र आता आग आटोक्यात आणण्यात आल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती असून रुग्णालय प्रशासनाने अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.


also read:
https://anmnewsmarathi.com/Home/GetNewsDetails?p=8017
https://anmnewsmarathi.com/Home/GetNewsDetails?p=8014
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  TAGS :              icu fire fire in ice maharashtra mumbai fire incident amravati