लाल बहादूर शास्त्री जयंती


02/10/2022 18:06:55 PM   Sweta Mitra         18


भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची आज 116 वी जयंती साजरी केली जात आहे. अतिशय साधी जीवनशैली असलेले शास्त्रीजी हे कार्यक्षम नेतृत्व असलेले गांधीवादी नेते होते. विशेष म्हणजे आज महात्मा गांधी जयंतीसोबतच लाल बहादूर शास्त्री यांचीही जयंती साजरी केली जात आहे. या दोन्ही महान नेत्यांची जन्मतारीख एकाच दिवशी आहे. शास्त्रीजी हे शांत मनाचे व्यक्तिमत्वही होते. त्यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1904 रोजी उत्तर प्रदेशातील मुगलसराय येथे झाला होता. ते घरात सर्वात लहान होते त्यामुळे त्यांना प्रेमाने नन्हे म्हटले जात. त्यांच्या आईचे नाव राम दुलारी आणि वडिलांचे नाव मुन्शी प्रसाद श्रीवास्तव होते. देशाच्या इतर नेत्यांप्रमाणेच शास्त्रीजींनाही देशाला स्वातंत्र करण्याची तळमळ होती, त्यामुळे त्यांनी 1920 मध्येच स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतली. 1921 च्या गांधीजींच्या भारत छोडो आंदोलनापासून ते 1942 च्या असहकार चळवळीत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. यादरम्यान त्यांना अनेकवेळा अटकही झाली आणि पोलिसांच्या कारवाईचा ते बळी ठरले. शास्त्रीजी पंतप्रधान झाल्यानंतर 1965 मध्ये भारत-पाकिस्तान युद्ध झाले, त्यावेळी त्यांनी देशाला कठीण परिस्थितीतून सावरले. सैनिक आणि शेतकऱ्यांचे महत्त्व पटवून देण्यासाठी त्यांनी ‘जय जवान जय किसान’चा नाराही दिला.


also read:
https://anmnewsmarathi.com/Home/GetNewsDetails?p=8017
https://anmnewsmarathi.com/Home/GetNewsDetails?p=8015
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  TAGS :              lal bahadur sashtri india pm former pm former prime minister o f india birth anniversary