सेकंदात कोसळली 4 मजली इमारत


02/10/2022 18:14:19 PM   Sweta Mitra         8नवी मुंबई मधून मोठी बातमी समोर येत आहे. कोपर खैराने येथील 4 मजली इमारत कोसळली. इमारतीच्या मलब्यात एकाच मृतदेह आढळला मात्र अजून त्याची ओळख पटली नाही. बचाव कार्य करणाऱ्यानी दिलेल्या माहितीनुसार इमारत कोसळल्या पूर्वीच 32 नागरीक बाहेर पडून आले. तर 8 नागरीक इमारत कोसळल्यानंतर बाहेर आले. 
शनिवारी रात्री साडेदहा ते अकराच्या सुमारास बोनकोडे गावातील चार माळ्याची इमारत कोसळली. सदर इमारतीचा धोकादायक इमारतीत समावेश नव्हता. मात्र दोन दिवसांपासून ही इमारत हलत असल्याचे अनेक रहिवाशांना जाणवत होते. शुक्रवारी कोपरखैरणे भागात अचानक झालेल्या जोरदार पावसात इमारतीतील काही रहिवाशांनी इतरत्र आसरा शोधला. शुक्रवारी इमारत कललेली आहे हे लक्षात आल्याने ३४ कुटुंबीयांनी इमारत रिकामी केली आणि शनिवारी इमारत कोसळली, अशी माहिती मनपाचे सहाय्यक उपायुक्त प्रशांत गावडे यांनी दिली.


also read:
https://anmnewsmarathi.com/Home/GetNewsDetails?p=8015
https://anmnewsmarathi.com/Home/GetNewsDetails?p=8016
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  TAGS :              mumbai maharashtra building building collapsed