चांदणी चौकातला पूल पाडला


02/10/2022 18:17:10 PM   Sweta Mitra         8


पुण्यातील चांदणी चौकातला पूल इतिहासजमा झाला आहे. पूल मध्यरात्री ठीक 1 वाजून 7 मिनिटांनी पाडण्यात आला. कंट्रोल ब्लास्टद्वारे हा पूल पाडण्यात आला. पूल पाडल्यानंतर तेथील राडारोडा उचलण्याचे काम जोरात सुरु आहे.  पुलाला 1 हजार 300 छिद्र पाडून 600 किलो स्फोटकं भरण्यात आली होती. 1 हजार 350 डिटोनेटरचा उपयोग नियंत्रित पद्धतीने ब्लास्ट करण्यासाठी करण्यात आली होती. पुणेकरांची कोंडी करणारा हा पूल क्षणभरात उद्ध्वस्त झाला. 
सध्या या ठिकाणचा मलबा हटवण्याचं काम प्रगतीपथावर आहे. या पुलाचे दगडी आणि सिमेंटचे बांधकाम स्फोटकांमुळे कोसळले आहे. मात्र पुलासाठी वापरलेल्या स्टीलचे प्रमाण अधिक असल्याचे स्फोटात पुल फक्त खिळखिळा झाला.  पुलाचा हा राडारोडा बाजूला करण्यासाठी 30 टिप्पर, 2 ड्रिलिंग मशीन, 16 एक्स्कॅव्हेअर, 4 डोझर, 4 जे सी बी यांच्या सहाय्याने संपूर्ण रात्रभर हा राडारोडा काढण्याचे काम सुरु आहे. दरम्यान पूल पाडताना त्याचे तुकडे अथवा धूळ परिसरात उडू नये यासाठी 6 हजार 500 मीटर चॅनल लिंक्स, 7 हजार 500 वर्ग मीटर जिओ टेक्स्टाईल, 500 वाळूच्या पिशव्या आणि 800 वर्ग मीटर रबरी मॅटचा वापर आच्छादनासाठी करण्यात आले होते.


also read:
https://anmnewsmarathi.com/Home/GetNewsDetails?p=8014
https://anmnewsmarathi.com/Home/GetNewsDetails?p=8015
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  TAGS :              mumbai maharashtra pune bridge bridge collapsed chandni chawk