सप्तश्रुंगी देवीच्या दर्शनानंतर राज ठाकरे मुंबईला रवाना


02/10/2022 18:18:35 PM   Sweta Mitra         12


मनसे अध्यक्ष राज ठाकरे देवदर्शनाच्या निमित्ताने नाशिक दौर्‍यावर आहेत. शिर्डीचे साईबाबा तसेच सप्तश्रुंगी देवीच्या दर्शनाच्या निमित्ताने त्यांचा हा खाजगी दौरा आहे. त्याअनुषंगाने राज ठाकरे यांचे सपत्नीक शनिवारी सकाळी साडेआठ वाजता शिर्डी विमानतळावर खाजगी विमानाने आगमन झाले. शिर्डीत साईबाबा समाधी दर्शन घेतल्यानंतर खाजगी विमानाने ओझर विमानतळावर पोहचले. यानंतर त्यांनी शहरातील एका खाजगी हॉटेल मध्येच थांबणे पसंत केले. राज दिवसभरात फक्त दुपारच्या जेवणाकरता बाहेर पडले. त्यांचे जुने मित्र तसेच पक्षाचे माजी नेते अतुल चांडक यांच्या निवासस्थानी त्यांनी सपत्नीक दुपारच्या जेवणाच्या निमित्ताने भेट दिली. दरम्यान आज २ ऑक्टोबर रोजी म्हणजेच रविवारी सकाळी राज नाशकातून सप्तश्रुंगी देवीच्या दर्शनासाठी रवाना होणार आहेत. सकाळी ८ वाजता त्यांच्या हस्ते सप्तश्रुंगी देवीची पूजा होणार आहे. सप्तश्रुंगी देवीच्या दर्शनानंतर राज ठाकरे थेट ओझर विमानतळावरून खाजगी विमानाने मुंबईला रवाना होती. राज यांचा हा दौरा पूर्णतः खाजगी असणार आहे.


also read:
https://anmnewsmarathi.com/Home/GetNewsDetails?p=8015
https://anmnewsmarathi.com/Home/GetNewsDetails?p=8016
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  TAGS :              raj thackerey mumbai maharashtra mns mns cief nabnirban sena