दुर्गा विसर्जनावेळी मोठी दुर्घटना


06/10/2022 18:31:44 PM   Sweta Mitra         7


पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी येथे बुधवारी रात्री दुर्गा विसर्जनाच्या वेळी एक मोठी दुर्घटना घडली. जलपायगुडीतील माल नदीत विसर्जनादरम्यान अचानक आलेल्या पुरामुळे 7 जणांचा मृत्यू झाला, तर अनेक लोक बेपत्ता आहेत. या अद्याप 30-40 लोक बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे.
अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आतापर्यंत 7 मृतदेह नदीमधून बाहेर काढण्यात आले आहेत, तर 10 जखमींना बाहेर काढण्यात आले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एनडीआरएफची टीम रात्री उशिरापर्यंत बचावकार्यात गुंतलेली होती. विसर्जनासाठी भाविक नदीच्या काठावर आले, मात्र काठावर पाणी कमी असल्याने त्यांनी मूर्तीचे विसर्जन व्यवस्थित व्हावे म्हणून थोडे पुढे गेले. लोक मध्यभागी उभे राहून मूर्तीचे विधीवत विसर्जन करत असताना अचानक नदीतील पाण्याची पातळी वाढली आणि जोरदार प्रवाह आला. पाण्याचा वेग इतका होता की नदी काठी उभे असलेल्या लोकांनाही काहीच मदत करता आली नाही. आणि अचानक आलेल्या पुरामुळे सारं काही उध्वस्त झाले. जोरदार प्रवाहामुळे लोक वाहू लागले. या घटनेचा हृदयद्रावक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
also read:
https://anmnewsmarathi.com/Home/GetNewsDetails?p=8014
https://anmnewsmarathi.com/Home/GetNewsDetails?p=8016
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  TAGS :              accident Durga visarjan