रेल्वेत मेगा भरती


06/10/2022 18:34:01 PM   Sweta Mitra         3






रेल्वेमध्ये अप्रेंटिस पदांसाठी भरती सुरू झाली आहे. लवकरच अनेक ट्रेडमध्ये 3000 हून अधिक पदे भरली जातील. याची माहीती रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. अर्ज करण्याची मुदत 30 सप्टेंबर 2022 ते 29 ऑक्टोबर ही आहे.
रेल्वेच्या फिटर, वेल्डर, इलेक्ट्रिशियन, मशिनिस्ट, सुतार, पेंटर यासह अनेक ट्रेडमध्ये 3150 जागा निघाल्या आहेत. त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट er.indianrailways.gov.in वर ऑनलाइन अर्ज करावा. ही प्रक्रीया 30 सप्टेंबर 2022 पासून सुरू झाली आहे. केवळ ऑनलाइन पद्धतीनेच हे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. असे रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून किमान 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण केलेली असावी. तसेच, NCVT/SCVT द्वारे मान्यताप्राप्त संस्थेकडून वेल्डर, शीट मेटल वर्कर, लाइनमन, वायरमन, सुतार आणि पेंटर यासारख्या संबंधित शिक्षणातील ITI प्रमाणपत्र असावेत. उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 24 वर्षे असावेत.




also read:
https://anmnewsmarathi.com/Home/GetNewsDetails?p=8017
https://anmnewsmarathi.com/Home/GetNewsDetails?p=8016
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  



TAGS :              Railway Recruitment