29/10/2022 17:05:40 PM Sweta Mitra 49
किडणीच्या आजारांचे निदान किडनीचे अनेक रोग खूप गंभीर असतात आणि त्यावर योग्य वेळी इलाज केला नाही तर काहीच फायदा होत नाही. क्रॉनिक किडणी फेल्युअरसारख्या बऱ्या न होणाऱ्या आजाराच्या अंतिम टप्प्यातले, डायलिसीस आणि किडणी प्रत्यारोपनासारखे उपचार प्रचंड महाग असतात.
रोज तीन लिटरहून अधिक (१० ते १२ ग्लास) पाणी प्यायले पाहिजे. (ज्यांच्या अंगावर सूज नाही अशा व्यक्तींनी)
नियमित व्यायाम करणे आणि वजन नियंत्रणात ठेवणे.
४० वर्षांनंतर जेवणात मिठाचे प्रमाण कमी ठेवणे.
धुम्रपान, तंबाखू, गुटखा आणि दारूचे सेवन न करणे.
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय उगाचच कोणतेही अनावश्यक औषध न घेणे.