ऐश्वर्या राय बच्चनचा वाढदिवस


01/11/2022 17:08:59 PM   Sweta Mitra         14


बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनला अभिनय क्षेत्रात आता जवळपास २५ वर्षे झाली आहेत. एवढ्या मोठ्या करिअरच्या काळात ऐश्वर्याने रोमँटिक, थ्रीलर, अॅक्शन, ऐतिहासिक असे सर्व प्रकारचे चित्रपट केले आहेत. पण या चित्रपटांमध्ये तिने फारसे इंटिमेट सीन किंवा किसिंग सीन्स दिलेले नाहीत. १९९७ मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी ऐश्वर्या सुरुवातीपासूनच रोमँटिक आणि इंटिमेट सीन्सपासून दूर राहत असे. अर्थात तिने ही पॉलिसी ‘धूम २’ आणि ‘ऐ दिल है मुश्किल’च्या वेळी तोडली. एकीकडे इतर बॉलिवूड अभिनेत्री कथेची गरज असल्यास अशाप्रकारचे सीन देण्यास कचरत नाहीत तर दुसरीकडे ऐश्वर्या मात्र या सगळ्यापासून नेहमीच लांब राहताना दिसते. जेव्हा एका मुलाखतीत ऐश्वर्याला इंटिमेट सीन्सशी संबंधित प्रश्न विचारण्यात आला होता त्यावेळी ती त्या पत्रकारावर चिडली होती.
ऐश्वर्या राय बच्चनचा आज ४९ वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने जाणून घेऊयात तिच्या आयुष्यातील इंटिमेट सीनच्या प्रश्नाचा किस्सा. जेव्हा ऐश्वर्याला इंटिमेट सीन्ससंबंधी प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ती खूप नाराज झाली होती आणि संबंधीत पत्रकाराला तिने सडेतोड उत्तर दिलं होतं. हे तेव्हा घडलं होतं जेव्हा ऐश्वर्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये तिचा हॉलिवूड चित्रपट ‘द पिंक पँथर २’ चित्रपट प्रमोट करण्यासाठी पोहोचली होती. 
also read:
https://anmnewsmarathi.com/Home/GetNewsDetails?p=8017
https://anmnewsmarathi.com/Home/GetNewsDetails?p=8016
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  TAGS :              Aishwarya Rai Bachchan Birthday indian actress bollywood