राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी लांबणीवर


01/11/2022 17:11:23 PM   Sweta Mitra         14


महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाकडून पुढे ढकलण्यात आली आहे. आता २९ नोव्हेंबरला ही सुनावणी होणार आहे. राज्यातील सत्तासंघर्ष, शिवसेनेतील फूट आणि १६ आमदारांची अपात्रता अशा अनेक मुद्द्यांवर सर्वोच्च न्यायालयात ही सुनावणी होणार होती. न्यायमूर्ती डॉ. धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठापुढे आज सुनावणी होणार होती.  या घटनापीठात न्यायमूर्ती एम. आर. शहा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती पी. एस. नरसिंह यांचा या घटनापीठात समावेश होता. मात्र आता ही सुनावणी २९ नोव्हेंबर रोजी होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही पक्षकारांना कागदपत्रं सादर करण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाकडून देण्यात आले. दोन्ही बाजूच्या वकिलांना एकत्र बसून चर्चा करण्याचे तसेच दोन्ही बाजू लेखी स्वरूपात मांडण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. तसेच दोन्ही पक्षकारांना 4 आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे. या सत्तासंघर्षावरील पुढील सुनावणी 4 आठवड्यांनी सुप्रीम कोर्टात 29 नोव्हेंबरला होणार आहे.
also read:
https://anmnewsmarathi.com/Home/GetNewsDetails?p=8016
https://anmnewsmarathi.com/Home/GetNewsDetails?p=8014
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  TAGS :              hearing power struggle state postponed