LPG सिलेंडर झाला स्वस्त


01/11/2022 17:13:34 PM   Sweta Mitra         14


नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी देशातील नागरिकांना केंद्र सरकारने गुडन्यूज दिली आहे. एलपीजी सिलिंडरच्या दरात मोठी कपात करण्यात आली आहे. आज, 1 नोव्हेंबरपासून एलपीजी गॅस सिलिंडर 115 रुपयांनी स्वस्त झाला आहे. कमर्शियल एलपीजी सिलिंडरच्या दरात ही कपात करण्यात आली आहे. घरगुती गॅस सिलिंडरचे दर जैसे ठेवण्यात आले आहेत. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात मागील 6 जुलैपासून कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडने दिलेल्या माहितीनुसार, आज 1 नोव्हेंबरपासून देशात कमर्शियल गॅस सिलिंडर म्हणजे 19 किलोग्रॅम वजनाच्या सिलिंडरच्या दरात मोठी कपात करण्यात आली आहे. 115 रुपयांनी गॅस सिलिंडर स्वस्त झाला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे हॉटेल, रेस्टारंट व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्लीत 115.50 रुपये, कोलकात्यात 113 रुपये, मुंबईत 115.50 रुपये तर चेन्नईत 116.5 रुपयांनी सिलिंडर स्वस्त झाला आहे. यापूर्वी गेल्या महिन्यात 1 ऑक्टोबरला कमर्शियल सिलिंडरच्या दरात 25 रुपयांनी कपात करण्यात आली होती.
also read:
https://anmnewsmarathi.com/Home/GetNewsDetails?p=8014
https://anmnewsmarathi.com/Home/GetNewsDetails?p=8016
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  TAGS :              LPG cylinder cheaper commercial