LIVE: न्यूझीलंड vs आयर्लंड


04/11/2022 17:08:03 PM   Sweta Mitra         22


टी20 वर्ल्ड कपमध्ये आज ग्रुप 1 मधील दोन महत्त्वपूर्ण सामने खेळवले जाणार आहे. यामध्ये पहिला न्यूझीलंड आणि आयर्लंड आमने-सामने असणार आहेत. भारतीय वेळेनुसार दिवसातील पहिला सामना न्यूझीलंड विरुद्ध आयर्लंड सकाळी 9.30 वाजता ऑस्ट्रेलियाच्या अॅडलेड येथील अॅडलेड ओव्हल या क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहेत.  
ऑस्ट्रेलियाच्या भूमीत  टी20 विश्वचषक 2022  स्पर्धा सुरु असून आज स्पर्धेत ग्रुप 1 मध्ये महत्त्वाचे सामने रंगणार आहेत. सेमीफायनलपूर्वी केवळ 6 सामने राहिले असून अजून कोणताच संघ सेमीफायनलमध्ये पोहोचलेला नाही. पण आज होणाऱ्या सामन्यातून आपल्याला सेमीफायनलमध्ये एन्ट्री करणारे संघ काही प्रमाणात स्पष्ट होऊ शकतात. ग्रुप 1 मध्ये न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि श्रीलंका या संघामध्ये सेमीफायनलची शर्यत आहे. दुसरीकडे आयर्लंड, अफगाणिस्तान यांचं आव्हान संपलं आहे. त्यात न्यूझीलंड सर्वाधिक नेटरनरेटने अव्वल स्थानावर आहे. पण इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांचे गुण प्रत्येकी 5 आहेत. पण आज न्यूझीलंड आयर्लंडला मात देऊन 7 गुण करु शकते आणि नेटरननेरट इतरांपेक्षा खूप असल्याने जवळपास आपलं स्थान सेमीफायनलमध्ये निश्चित करु शकते.
also read:
https://anmnewsmarathi.com/Home/GetNewsDetails?p=8015
https://anmnewsmarathi.com/Home/GetNewsDetails?p=8013
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  TAGS :              LIVE New Zealand cricket Ireland