LIVE: न्यूझीलंड vs पाकिस्तान सेमीफायनल 1


09/11/2022 17:50:07 PM   Sweta Mitra         10






टी-२० विश्वचषक २०२२ मधील पहिला उपांत्य फेरीचा सामना न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान संघात आज (बुधवार) खेळला जात आहे. हा सामना सिडनी येथे दुपारी १:३० वाजता सुरु झाला आहे. तत्पुर्वी न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. स्पर्धेला सुरुवात झाल्यापासून न्यूझीलंड संघ आपण उपांत्य फेरीतील प्रबळ दावेदार असल्याचे दाखवत होता. त्याचवेळी न्यूझीलंडची भक्कम वाटचाल रोखण्याचे आज पाकिस्तानचे लक्ष्य असणार आहे.
न्यूझीलंडने साखळी फेरीतील ५ पैकी ३ सामने जिंकत त्यांच्या ग्रुपमध्ये अव्वल स्थान कायम राखले आणि उपांत्य फेरीत प्रवेश करणारा पहिला संघ होण्याचा मान त्यांनी मिळवला. दुसरीकडे पाकिस्तानला नशिबाची साथ लाभली. नेदरलॅंड्सने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केल्याने पाकिस्तानच्या उपांत्य फेरीच्या आशा जिंवत राहिल्या. तसेच त्यांनी शेवटच्या साखळी सामन्यात बांगलादेशचा पराभव करत उपांत्य फेरीचे तिकिट मिळवले.या सामन्यातील विजेता होणार संघ थेट अंतिम फेरीत धडक मारणार आहे. त्यानंतर त्यांचा सामना दुसऱ्या उपांत्य फेरीतील विजेत्या संघासोबत १३ तारखेला होईल.




also read:
https://anmnewsmarathi.com/Home/GetNewsDetails?p=8015
https://anmnewsmarathi.com/Home/GetNewsDetails?p=8013
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  



TAGS :              LIVE New Zealand cricket Pakistan Semi Final