नोराला पाहून मुलगी ढसाढसा रडली


12/11/2022 18:05:47 PM   Sweta Mitra         15


बॉलीवूड अभिनेत्री नोरा फतेहीचा नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, नोरा जात असताना तिच्या जवळ अचानकच एक तिची फॅन येते. नोराला पाहून ती इतकी जास्त भावनिक होते की, सरळ सरळ ती रडायलाच लागते. हे पाहून नोरा तिला जवळ घेते आणि तिचे अश्रू पुसते.
या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, नोरा तिच्या फॅनला जवळ घेऊन मस्त गप्पा देखील मारते. शेवटी जाताना त्या फॅनच्या कपाळाची किस नोरा घेते आणि बाय बोलते. आता नोरा आणि तिच्या या फॅनचा व्हिडीओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होताना दिसतोय. काहीजण हा व्हिडीओ पाहून नोराचे काैतुक करत आहेत. अजय देवगण आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या थँक गॉड चित्रपटात शेवटी नोरा दिसली होती.


also read:
https://anmnewsmarathi.com/Home/GetNewsDetails?p=8017
https://anmnewsmarathi.com/Home/GetNewsDetails?p=8014
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  TAGS :              nora nora fatehi actress bollywoodactress fan moment