बीडमध्ये भुंकण्यावरून भयानक प्रकार


12/11/2022 18:07:18 PM   Sweta Mitra         13


बीडमध्ये माजी कृषी अधिकाऱ्याने रागाच्या भरात कुत्र्यावर गोळ्या झाडल्याची विचित्र घटना समोर आली आहे. शेजाऱ्याच्या घरील कुत्रा भुंकल्याने भडकलेल्या माजी कृषी अधिकाऱ्याने 'माझ्यावर जो भुंकतो त्याला मी ठोकतो', असं म्हणत कुत्र्यावरच गोळ्या झाडल्या. हा गंभीर प्रकार बीडच्या परळी वैजनाथ शहरातून समोर आला आहे.
कुत्र्यावर निर्दयीपणे गोळ्या झाडणाऱ्या माजी अधिकाऱ्याचं नावं रामराज कारभारी घोळवे असं आहे. या अधिकाऱ्याच्या घरासमोरच विकास हरिभाऊ बनसोडे यांचं हॉटेल आहे. त्यांचा कुत्रा मोठ्याने भुंकत होता. कुत्र्याचं भुंकणं ऐकून हा अधिकारी चिडला. चिडलेल्या अधिकाऱ्याने पाठलाग करुन जवळच्या पिस्तुलमधून कुत्र्यावर गोळ्या झाडल्या. या घटनेत बंदुकीची गोळी लागून कुत्रा जागेवर ठार झाला. या घटनेनं एकच खळबळ उडाली. कुत्र्याच्या मृत्यूमुळे संतप्त झालेल्या हॉटेल मालकाने या  अधिकाऱ्याला याबाबत जाब विचारला. यावर 'मला जो भुंकतो त्याला मी ठोकतो' असं उत्तर अधिकाऱ्याने दिलं. परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात हॉटेल मालकाने तक्रार केली आहे. त्यानुसार या माजी अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


also read:
https://anmnewsmarathi.com/Home/GetNewsDetails?p=8017
https://anmnewsmarathi.com/Home/GetNewsDetails?p=8014
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  TAGS :              beed maharashtra mumbai cctv cctv footage viral dog