आकाशात दोन विमानांची धडक


13/11/2022 18:26:52 PM   Sweta Mitra         18


अमेरिकेतील डलास एक एयर शोच्या दरम्यान अमेरिकन वायूसेनेच्या दोन विमानांची हवेतच धडक होऊन भीषण अपघात झाला. धडक झाल्याने दोन्ही विमान लगेचच जमिनीवर पडले आणि स्फोट होऊन त्यांचे तुकडे-तुकडे झाले. यूएस फेडर एविएशन अॅडमिनिस्ट्रेशनच्या हवाल्याने याचे वृत्त देण्यात आले आहे.
फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन (FAA) नुसार, शनिवारी अमेरिकेतील डॅलस येथे वर्ल्ड वॉर-2 स्मरणार्थी एअरशो आयोजित करण्यात आला होता. एअर शो सुरू असताना अचानक बोईंग बी-17 फ्लाइंग फोर्ट्रेस बॉम्बरची दुसऱ्या बेल पी-63 किंगकोब्रा फायटरशी समोरासमोर टक्कर झाली. डॅलस एक्झिक्युटिव्ह विमानतळाजवळ हा अपघात झाला. या अपघाताची माहिती मिळताच आपत्कालीन कर्मचारी अपघाताच्या ठिकाणी पोहोचले. त्यानंतर विमानातील क्रू मेंबर्सची चौकशी करण्यात येत आहे. दोन्ही विमानात किती लोक होते हे सध्या स्पष्ट झालेले नाही, अशी माहिती विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी ट्विटरवर दिली. या विमान अपघाताचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शो मध्ये सहभागी लोकांद्वारे हा व्हिडिओ कॅप्चर करण्यात आला.


also read:
https://anmnewsmarathi.com/Home/GetNewsDetails?p=8014
https://anmnewsmarathi.com/Home/GetNewsDetails?p=8013
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  TAGS :              FLIGHT FLIGHT CRASH AMERICA US DALES