एकनाथ खडसेंचे गिरीश महाजनांना खुलं आव्हान!


13/11/2022 18:29:59 PM   Sweta Mitra         10


गेल्या काही दिवसांपासून जळगावमधील राजकीय वातावरण तापू लागलं आहे. राज्यात ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट आणि ठाकरे गट विरुद्ध भाजपा असा सामना सुरू असताना जळगावमध्ये मात्र एकनाथ खडसे विरुद्ध गिरीश महाजन असा थेट सामना होताना पाहायला मिळत आहे. दूध संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने हे दोन्ही नेते एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. या पार्श्वभूमीवर भाजपा आमदार आणि मंत्री गिरीश महाजन यांनी खडसेंना दूधसंघाची निवडणूक लढवून दाखवण्याच्या दिलेल्या आव्हानावर आता खडसेंनी गिरीश महाजनांना जाहीर आव्हान दिलं आहे. शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत एकनाथ खडसेंनी गिरीश महाजनांवर टीकास्र सोडलं.
“खडसेंचे कारनामे लवकरच समोर येतील. खडसेंना संपूर्ण जळगाव जिल्हा ओळखतो. त्यांना आता भरपूर वेळ आहे. म्हणून ते रोज बोलत असतात. विरोधी पक्ष म्हणून त्यांचं काम त्यांनी करत राहावं. माझं काम लोकांसमोर आहे. मात्र, त्यांनी जे केलंय ते लवकरच समोर येईल”, असं म्हणत गिरीश महाजनांनी एकनाथ खडसेंना लक्ष्य केलं होतं. त्यावरून खडसेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. “तुमच्यात हिंमत असेल, तेवढे कारनामे काढा माझे. मी तर आव्हान देणारा माणूस आहे. आत्तापर्यंत तुम्ही कारनामे का नाही काढले? आता तर तुम्ही मंत्री आहात”, असं खडसे म्हणाले आहेत.


also read:
https://anmnewsmarathi.com/Home/GetNewsDetails?p=8017
https://anmnewsmarathi.com/Home/GetNewsDetails?p=8016
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  TAGS :              EKNATH KHADSE POLITICS MAHARASHTRA MAHARASHTRA POLITICS MUMBAI POLITICS SHIVSENA NCP BJP