बाहुबली फेम अभिनेत्री अडकणार लग्न बंधनात


17/11/2022 17:37:34 PM   Sweta Mitra         17


'बाहुबली' फेम अभिनेत्री तमन्ना भाटिया लवकरच लग्न करणार असल्याचं समोर आलं आहे. तमन्नाने 'बिजनेस हसबँड' म्हणत एक पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर तमन्ना लग्न करणार असल्याच्या चर्चा होऊ लागल्या. तमन्नाने लग्नाबाबत खुलासा केला असून 'बिजनेस हसबँड'च्या प्रपोजलची बाब अफवा असल्याचं म्हटलं आहे. तिने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती स्वत: पुरुषाच्या गेटअपमध्ये होती. तिने हा व्हिडिओ शेअर केला होता. या पोस्टला तिने बिजनेसमॅन हसबँड असं कॅप्शन दिलं होतं. त्यावरुनच तमन्ना लग्न करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं. तमन्नाने ती आता लग्न करत नसल्याचं स्पष्ट केलं आहे. माझा लग्न संस्थेवर विश्वास आहे. मला लग्न करायचं आहे आणि मुलंही हवी आहेत, पण आता माझ्याकडे वेळ नाही. मी सध्या माझ्या कामावर फोकस करते आहे. लग्नाची बाब अफवा असल्याचं म्हणत तिने सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
also read:
https://anmnewsmarathi.com/Home/GetNewsDetails?p=8014
https://anmnewsmarathi.com/Home/GetNewsDetails?p=8017
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  TAGS :              Baahubali fame actress bollywood stuck marriage