संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या तारखांची घोषणा


19/11/2022 17:36:07 PM   Sweta Mitra         6


संसदेचे हिवाळी अधिवेशन येत्या ७ डिसेंबरपासून सुरू होत आहे. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या तारखांची घोषणा केली. ७ डिसेंबरपासून सुरू होणारे अधिवेशन २९ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. ''अमृत काळात अधिवेशनादरम्यान विधिमंडळाचे काम आणि इतर मुद्द्यांवर चर्चा होणे अपेक्षित असल्याचं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनातील बैठक आणि कामकाजाची माहिती देताना केंद्रीय मंत्री जोशी यांनी ट्विट केले की, 7 डिसेंबर ते 29 डिसेंबर या कालावधीत चालणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात 23 दिवसांत 17 बैठका होणार आहेत. विशेष म्हणजे, हिवाळी अधिवेशन जुन्या संसदेच्या इमारतीत होण्याची शक्यता आहे. तसेच या महिन्याच्या अखेरीस किंवा डिसेंबरच्या सुरुवातीला सुमारे 1,200 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या नवीन संसद भवनाचे प्रतिकात्मक उद्घाटन करण्याचा विचारही सरकार करत असल्याची माहिती आहे. हिवाळी अधिवेशन साधारणपणे नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात सुरू होते आणि अधिवेशनादरम्यान सुमारे 20 बैठका होतात. परंतु 2017 आणि 2018 मध्ये डिसेंबरमध्ये अधिवेशन भरल्याचीही उदाहरणे आहेत.


also read:
https://anmnewsmarathi.com/Home/GetNewsDetails?p=8015
https://anmnewsmarathi.com/Home/GetNewsDetails?p=8017
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  TAGS :              mp parliament prahlad joshi winter session politics