HBD: बादशाह


19/11/2022 17:37:44 PM   Sweta Mitra         6








बादशाहचे दिल्लीत स्वतःचे घर आहे, ज्याची किंमत 12 कोटी रुपये आहे. बादशाहकडे अनेक लग्झरी गाड्या आहेत. रिपोर्ट्सनुसार, बादशाहची एकूण संपत्ती 37 कोटी रुपये आहे. बादशाह हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे कायम चर्चेत असतो. 2012 मध्ये बादशाहनं जॅस्मिनसोबत लग्नगाठ बांधली. 2017 मध्ये जॅस्मिन आई-वडील झाले. त्यांना एक मुलगी झाली. मुलीचं नाव त्यांनी जेसी ग्रेस असं ठेवलं. रिपोर्टनुसार, लॉकडाऊन दरम्यान जॅस्मिन आणि बादशाह यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाल्यानं  लॉकडाऊन संपल्यानंतर जॅस्मिन तिच्या मुलीला घेऊन लंडनला गेली. बादशाह आणि जॅस्मिन दोघे विभक्त झाले, असं म्हटलं जातं. सध्या बादशाहचं नाव  अभिनेत्री ईशा रिखीसोबत जोडलं जात आहे. दोघे एकमेकांना डेट करत आहेत, असं म्हटलं जात आहे.दोघांची ओळख एका कॉमन फ्रेंडद्वारे झाली.  त्यानंतर दोघांनी एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली, अशी चर्चा सध्या सुरु आहे. पण बादशाहनं  ईशा रिखीसोबतच्या नात्याबाबात अजून कोणतीही माहिती दिली नाही.





also read:
https://anmnewsmarathi.com/Home/GetNewsDetails?p=8014
https://anmnewsmarathi.com/Home/GetNewsDetails?p=8013
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  



TAGS :              badshah happy birthday entertainment entertainment news rapper