सुष्मिता सेनचा आज वाढदिवस


19/11/2022 17:39:27 PM   Sweta Mitra         8


बॉलिवूडशिवाय जगभरात फॅशन आयकॉन मानली जाणारी अभिनेत्री सुष्मिता सेन आज 46 वा वाढदिवस साजरा करत आहे.  सुष्मिता सेनने आपल्या सौंदर्य आणि दमदार अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींच्या यादीमध्ये स्वत:ची जागा निर्माण केली आहे. सुष्मिताने वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी ‘मिस इंडिया’चा किताब जिंकला होता. त्यावर्षी ती ‘मिस युनिव्हर्स’ देखील झाली होती. सुष्मिता सेनने बॉलिवूडला अनेक सुपरहिट चित्रपट दिले. सध्या ती ‘ताली’ वेबसीरिजमुळे चर्चेत आहे. 1994 हे वर्ष सुष्मिता सेनसाठी खूपच लकी ठरले. या वर्षी तिने मिस इंडिया आणि मिस युनिव्हर्स या दोन मोठे अवॉर्ड जिंकले. जेव्हा सुष्मिता सेनने हे दोन्ही अवॉर्ड जिंकले तेव्हा ती फक्त 18 वर्षांची होती. सुष्मिता सेनला भारताची पहिली महिला मिस युनिव्हर्सचा किताबही मिळाला आहे.also read:
https://anmnewsmarathi.com/Home/GetNewsDetails?p=8013
https://anmnewsmarathi.com/Home/GetNewsDetails?p=8016
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  TAGS :              sushmita sen actress bollywood actress miss universe