IAS अधिकाऱ्याला सोशल मीडियावर फोटो पोस्ट करणे पडले महाग


19/11/2022 17:41:00 PM   Sweta Mitra         9


निवडणूक निवडणूक ड्युटीवर असणाऱ्या एका IAS अधिकाऱ्याला सोशल मीडियावर फोटो पोस्ट करणे महागात पडले आहे. गुजरात निवडणुका सुरू झाल्या आहेत. निवडणूक आयोगाने निवडणुकांची जोरदार तयारी सुरू केली आहे. या निवडणुकीत आयएएस अधिकारी अभिषेक सिंह या अधिकाऱ्यांना पर्यवेक्षकपद दिले होते, पण, अधिकाऱ्याच्या एक चुकीमुळे दुसऱ्याच दिवशी त्यांना आयोगाने पदावरुन हटवले आहे. गुजरातच्या बापूनगर आणि असर्वा विधानसभा मतदारसंघाचे जनरल ऑब्झर्व्हर पद स्वीकारल्यानंतर सिंह यांनी इंस्टाग्राम आणि ट्विटरवर काही फोटो शेअर केली, ज्यामध्ये ते त्यांच्या कारसोबत पोज देताना दिसत आहेत. यासोबतच त्यांच्या वाहनाच्या नंबर प्लेटवर लाल रंगात ऑब्झर्व्हर असे लिहिलेले दिसत आहे.


also read:
https://anmnewsmarathi.com/Home/GetNewsDetails?p=8017
https://anmnewsmarathi.com/Home/GetNewsDetails?p=8014
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  TAGS :              gujarat gujarat election assembly election 2022 ias oficer