इंदिरा गांधी जयंती


19/11/2022 17:45:27 PM   Sweta Mitra         7


देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांची आज म्हणजे 19 नोव्हेंबर रोजी 105 वी जयंती साजरी होत आहे. त्या भारताच्या पहिल्या आणि आतापर्यंतच्या एकमेव महिला पंतप्रधान होत्या. देशाच्या विकासात त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात घेतलेले अनेक निर्णय देशाच्या प्रगतीसाठी फायद्याचे ठरले. त्यांचे काही निर्णय खूप वादग्रस्त देखील ठरतं त्यांना टीकेलाही सामोरे जावे लागले आहे. 
19 नोव्हेंबर 1917 रोजी देशाचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या घरी  इंदिराजींचा जन्म झाला. घरातूनच देश सेवेचा वारसा मिळालेल्या  इंदिराजी यांनी वयाच्या अवघ्या 11 व्या वर्षीच ब्रिटिश राजवटीविरुद्ध लढा सुरु केला होता. आजोबा मोतीलाल नेहरू आणि वडील पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडून प्रेरणा घेत त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतला. वयाच्या 13 व्या वर्षी त्यांनी इंग्रजांच्या विरोधात ‘वानरसेना’ नावाची संघटना स्थापन केली आणि स्वातंत्र्य लढ्यातील नेत्यांपर्यंत संदेश पोहोचवण्याचे काम केले. त्या 1938 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये औपचारिकपणे सामील झाल्या.


also read:
https://anmnewsmarathi.com/Home/GetNewsDetails?p=8015
https://anmnewsmarathi.com/Home/GetNewsDetails?p=8016
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  TAGS :              indira gandhi congress congress leader pm former pm