अमीर खानच्या मुलीचा साखरपुडा


19/11/2022 17:46:44 PM   Sweta Mitra         5


अभिनेता आमिर खानची लेक आयरा खान फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरेला डेट करत असल्याचं जगजाहिर आहे. काही महिन्यांपूर्वीच नुपूरने तिला गुडघ्यावर बसून सगळ्यांसमोर लग्नाची मागणी घातली होती. आता या दोघांनी गुपचूप साखरपुडा केला असल्याचं बोललं जात आहे. या दोघांचे फोटो व व्हिडीओही सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. २०२० मध्ये करोना काळात आयरा व नुपूर एकमेकांच्या अधिक जवळ आले. त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. आता दोघांनी साखरपुडा केला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटो व व्हिडीओमध्ये इराने लाल रंगाचा गाऊन परिधान केला असल्याचं दिसत आहे. तर नुपूरने काळ्या रंगाचा कोट, त्याच रंगाची पँट परिधान केली आहे. दोघांनीही अगदी साध्या पद्धतीने साखरपुडा केला असल्याचं व्हायरल व्हिडीओमधून दिसून येतं.


also read:
https://anmnewsmarathi.com/Home/GetNewsDetails?p=8014
https://anmnewsmarathi.com/Home/GetNewsDetails?p=8015
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  TAGS :              amir khan actress bollywood engagement amir khan