आज 'भारत जोडो'चा महाराष्ट्रातील शेवटचा दिवस


20/11/2022 17:55:50 PM   Sweta Mitra         7


काँग्रेसची 'भारत जोडो यात्रा' आज नांदेड जिल्ह्यात प्रवेश करत 14 दिवसांपूर्वी महाराष्ट्रात धडकली. आज 20 नोव्हेंबर हा महाराष्ट्रातील भारत जोडो यात्रेचा शेवटचा दिवस असणार आहे. या दिवशीही जळगाव जामोद या विधानसभा मतदारसंघातही यात्रा असणार आहे. त्यानंतर जळगाव जामोदमार्गे ही यात्रा मध्यप्रदेशात प्रवेश करणार आहे. काल रात्रीचा मुक्काम या यात्रेनं भेंडवळ या गावी केला. त्याआधी राहुल गांधी यांनी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना आदरांजली अर्पण केली.  
राहुल गांधी यांनी शनिवारी शहीद शेतकऱ्यांना आदरांजली अर्पण केली. भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये शेतकरी चारीबाजूंनी नाडवला जात आहे. आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांना व शेतीला उद्ध्वस्त करणारे तीन काळे कृषी कायदे मोदी सरकारने आणले होते. या जुलमी कायद्यांविरोधात देशातील शेतकऱ्यांनी आवाज बुलंद करत दिल्लीला घेराव घालून ऐतिहासिक आंदोलन केले. मोदी सरकारला अखेर शेतकऱ्यांच्या आवाजासमोर झुकावे लागले व तीन काळे कायदे रद्द करावे लागले, या घटनेला आज एक वर्ष झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांशी संवाद साधला असता तर 733 बळी टाळता आले असते असे खासदार राहुल गांधी यांनी म्हटले.


also read:
https://anmnewsmarathi.com/Home/GetNewsDetails?p=8013
https://anmnewsmarathi.com/Home/GetNewsDetails?p=8015
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  TAGS :              bharat bharat jodo yatra rahul gandhi congress congress leader congress mp