ज्येष्ठ अभिनेत्री तबस्सुम गोविल यांचे निधन


20/11/2022 17:57:27 PM   Sweta Mitra         7ज्येष्ठ अभिनेत्री तबस्सुम यांचे वयाच्यातबस्सुम यांचा मुलगा होशांग गोविल यांनी अशी माहिती दिली की, शुक्रवारी संध्याकाळी त्यांच्या आईने अखेरचा श्वास घेतला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी हृदयविकाराच्या झटक्याने तबस्सुम यांचे निधन झाले. होशांग म्हणाले की, 'त्या पूर्णपणे बऱ्या होत्या. आम्ही १० दिवसांपूर्वीच आमच्या शोचे शूटिंग केले होते. पुढील आठवड्यात पुन्हा एकदा शूटिंग होणार होते.'
अभिनेत्रीच्या मुलाने पुढे असे म्हटले की, 'त्यांना गॅस्ट्रोची समस्या होती. त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले होते, पण डिस्चार्जही मिळाला. मात्र काल पुन्हा त्यांना भरती करण्यात आले. दोन मिनिटांमध्ये त्यांना दोन वेळा हृदयविकाराचा झटका आला.'
तबस्सुम यांनी सिनेमा आणि मालिकांमध्ये काम करत एक वेगळा प्रेक्षकवर्ग कमावला होता. शिवाय आपल्या मधाळ निवेदनानं 'फुल खिले है गुलशन गुलशन' हा कार्यक्रम त्यांनी अजरामर केला.


also read:
https://anmnewsmarathi.com/Home/GetNewsDetails?p=8014
https://anmnewsmarathi.com/Home/GetNewsDetails?p=8017
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  TAGS :              actress bollywood maharashtra mumbai entertainment tavassum govil dead