ट्विटरवर ट्रम्प यांची वापसी


20/11/2022 18:05:31 PM   Sweta Mitra         6


अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विटरवर पुनरागमन झालं आहे. उद्योगपती इलॉन मस्क यांच्याकडे ट्विटरची मालकी आल्यानंतर अनेक वेगवान घडामोडी घडत असतानाच, ट्रम्प यांचं अकाऊंट पुन्हा सुरू करण्याचा निर्णय झाला होता. डोनाल्ड ट्रम्प यांचं अकाऊंट पुन्हा सुरू करावं का, यासाठी इलॉन मस्क यांनी ट्विटरवर पोल घेतला होता. त्यात ट्रम्प यांचं अकाऊंट सुरू करण्याच्या बाजूनं अधिक मतं पडली. डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विटर अकाऊंट जानेवारी 2021 मध्ये कायमच निलंबित करण्यात आलं होतं. हिंसेला प्रोत्साहन देण्याच्या शक्यतेमुळे ही कारवाई केल्याचे ट्विटरनं म्हटलं होतं. डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विटर अकाऊंट जानेवारी 2021 मध्ये कायमच निलंबित करण्यात आलं होतं. हिंसेला प्रोत्साहन देण्याच्या शक्यतेमुळे ही कारवाई केल्याचे ट्विटरनं म्हटलं होतं. ट्विटरने याबाबत सांगताना राष्ट्राध्यक्षा डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या काही दिवसात केलेल्या ट्वीट्सचा दाखला दिला होता.


also read:
https://anmnewsmarathi.com/Home/GetNewsDetails?p=8013
https://anmnewsmarathi.com/Home/GetNewsDetails?p=8016
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  TAGS :              trump donald trucmp democratic amerca usa united states of america twitter