राज्यात थंडीचा कडाका वाढला


20/11/2022 18:08:09 PM   Sweta Mitra         6


राज्यात पुणे, सातारा, नाशिकसह राज्यभर थंडीचा जोर वाढला आहे. अनेक ठिकाणी तापमान कमालीची घट झाली आहे. महाबळेश्वरमध्ये तापमान 10 अंशांच्या खाली गेल्याची नोंद झाली आहे. तर वेण्णालेक परिसरात  6 अंशांची नोंद झाली आहे. धुळ्यातही तापमानात कमालीची घट झाली आहे. तर कोकणातील काही भाग सोडता थंडीची चाहुल लागली आहे. तर पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यात धुक्याची चादर पसरलेली पहायला मिळाली आहे. राज्यात थंडी अचानक कमी झाल्याने काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यात यंदा प्रथमच पारा 10 अशांखाली घसरला आहे हंगामातील नीचांकी 9.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. धुळ्यात तापमान 8.2 अंशांवर गेल्याने नागरिकांना चांगलीच हुडहुड भरली आहे. नाशिकमध्येही हुडहुडी भरण्यासारखी थंडी पडत असल्याचे दिसून येत आहे. तर पुण्यातही थंडीची चाहुल लागल्याने पुणेकरांचे स्वेटर्स, कानटोप्या कपाटातून बाहेर निघाल्या आहेत. रब्बी पिकांना पोषक थंडी पडल्यानं शेतकरी आनंदला आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यात ग्रामीण भागात धुके साचल्याने कडाक्याची थंडी पडली आहे. दरम्यान हवामान खात्याच्या माहितीनुसार पुढचे चार  दिवस थंडी असल्याचे सांगण्यात आले आहे.


also read:
https://anmnewsmarathi.com/Home/GetNewsDetails?p=8017
https://anmnewsmarathi.com/Home/GetNewsDetails?p=8014
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  TAGS :              weather weather department weather update winter winter season 2022 anm news