24 वर्षीय अभिनेत्रीचे निधन


21/11/2022 17:38:09 PM   Sweta Mitra         12


मनोरंजन विश्वातून एक दु:खद बातमी समोर येत आहे. खूप कमी वयात एका प्रसिद्ध अभिनेत्रीने या जगाचा निरोप घेतला आहे. तिच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. बंगाली सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री ऐंद्रिला शर्माने या जगाचा निरोप घेतला आहे. रविवारी २० नोव्हेंबर रोजी हृदय विकाराच्या झटक्याने तिचे निधन झाले.
मिळालेल्या माहितीनुसार अभिनेत्री बऱ्याच काळापासून आजारी होती. अशात तिला काही दिवसांपूर्वी हृदय विकाराचे झटके आले होते. त्यामुळे जवळच्या खाजगी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते. या दरम्यान डॉक्टरांनी तिला CPR देखील केले. डॉक्टरांनी तिला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले मात्र आज वयाच्या २४ व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला. १ नोव्हेंबर रोजी अचानक ती बेशुध्द पडली. त्यामुळे रुग्णालात दाखल केल्यावर तिला ब्रेन स्ट्रोक झाल्याचे समजले. या आजाराने तिच्या मेंदूत गाठी जमा झाल्या होत्या. डॉक्टरांनी सुरूवातीला यावर उपचार केले. त्यानंतर १५ नोव्हेंबर रोजी तिला वेगवेगळे हृदय विकाराचे झटके आले. याने तिची प्रकृती आणखीनच खालावली होती. अभिनयात यशाचे शिखर गाठत असतानाच ऐंद्रिलाला कर्करोग असल्याचे निदान झाले होते. पहिल्यांदा ती या रोगावर मात करून बाहेर पडली. मात्र नंतर पुन्हा तिला याचा त्रास होऊ लागला. दुसऱ्यांदा त्रास जाणवल्यावर तिची किमो थेरेपी देखील झाली होती. त्यानंतर डॉक्टरांनी तिचा कर्करोग पूर्ण बरा झाल्याचे जाहीर केले होते. तिने झुमुर या मालिकेतून तिच्या अभिनयातील कारकीर्दीला सुरूवात केली होती. त्यानंतर तिने अनेक प्रसिध्द टिव्ही शो, मालिका आणि चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवली.
also read:
https://anmnewsmarathi.com/Home/GetNewsDetails?p=8014
https://anmnewsmarathi.com/Home/GetNewsDetails?p=8013
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  TAGS :              year old actress passed away