श्रद्धा मर्डरवर आरोपीची कबुली


22/11/2022 16:29:04 PM   Sweta Mitra         15


संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या श्रद्धा हत्याकांड प्रकरणी एकामागून एक नवीन खुलासे होत आहेत. हत्या करणारा आरोपी आफताब अमीन पूनावालाची क्रूरता पाहून सर्वांनाच हादरवून सोडले आहे. आफताबला विशेष न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी त्याने श्रद्धाची हत्या केल्याची कबुली दिली आहे. रागाच्या भरात श्रद्धाची हत्या केली. त्यादिवशी मी जे काही केलं ती Heat Of The Moment होती, असं आफताबने न्यायालयातील न्यायाधीशांना म्हटलं आहे. तसेच आफताबच्या कोठडीत ४ दिवसांची वाढ देखील करण्यात आली आहे. आफताबची सध्या पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. याचदरम्यान त्याने श्रद्धाचं शिर एका तलावात टाकल्याचे चौकशीदरम्यान सांगितले. त्यानंतर पोलिसांनी छतरपूर जिल्ह्यात मैदान गढी तलावातील पाणी उपसणे सुरू केले होते. याशिवाय पाणबुड्यांना पाचारण करण्यात आले होते. अख्खा तलाव रिकामा केला, मात्र श्रद्धाचे शिर अद्याप सापडलेले नाही.
also read:
https://anmnewsmarathi.com/Home/GetNewsDetails?p=8015
https://anmnewsmarathi.com/Home/GetNewsDetails?p=8017
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  TAGS :              Confession accused Shraddha murder