स्वतःला पेटवून तरुणीला मारली मिठी


22/11/2022 16:35:31 PM   Sweta Mitra         15


स्वत:ला पेटवून घेत प्रेयसीला मारली मिठीऔरंगाबादमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. प्रियकराने स्वत:ला पेटवून घेत प्रेयसीला मिठी मारली आहे. यात दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. तरुणाने आत्महत्या करण्याचा का प्रयत्न केला?, हे अद्याप कळू शकलेले नाही. दरम्यान, एकतर्फी प्रेमातून त्याने हा प्रकार केल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. हे दोघेही डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठातील विद्यार्थी आहेत.पूजा कडूबा साळवे असं या पीडित तरुणीचं नाव आहे. तर गजानन खुशालराव मुंडे तरुणाचे नाव आहे. औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात आता दोघांवरही उपचार सुरू आहेत आणि मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे.गजानन याने एकतर्फी प्रेमातून हा संबंधित प्रकार केलाय.आणि या घटनेत गजानन हा 60 टक्के भाजलाय. तर तरुणी ही 35 ते 40 टक्के ही भाजल्याची माहिती पोलसांकडून आता मिळाली आहे.
also read:
https://anmnewsmarathi.com/Home/GetNewsDetails?p=8016
https://anmnewsmarathi.com/Home/GetNewsDetails?p=8014
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  TAGS :              fire hugged young boy woman