राज ठाकरेंची ऑडिओ क्लिप


22/11/2022 16:59:14 PM   Sweta Mitra         14


राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजीमहाराजांबद्दल केलेल्या विधानानंतर राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे. एकीकडे महाविकास आघाडी राज्यपालांना लक्ष्य करत असताना, दुसरीकडे भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी मात्र त्यांची पाठराखण केली आहे. यादरम्यान, मनसेनेही राज्यपालांवर टीका केली असून ट्विटरला एक व्हिडीओ शेअर केला आहे. मनसेने राज ठाकरेंची एक जुनी ऑडिओ क्लिप शेअर केली असून यामध्ये त्यांनी छत्रपतींबद्दल आपले विचार मांडले आहेत.
“काल-आज आणि उद्याही हिमालयाच्या मदतीला धावून जाणाऱ्या सह्याद्रीची प्रेरणा ‘छत्रपती शिवाजीमहाराज’च होते आणि अखंड राहतील, हे हिमालयातून आलेल्या महामहिम राज्यपाल कोश्यारी यांना कळावं यासाठी ही चित्रफीत,” असं मनसेने ट्वीट करताना म्हटलं आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये राज ठाकरे छत्रपती शिवाजीमहाराज आजही महाराष्ट्राचं प्रेरणास्थान असल्याचं सांगत असल्याचं ऐकू येत आहे. 
also read:
https://anmnewsmarathi.com/Home/GetNewsDetails?p=8013
https://anmnewsmarathi.com/Home/GetNewsDetails?p=8017
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  TAGS :              Audio clip Raj Thackeray