23/11/2022 16:14:38 PM Sweta Mitra 55
आज सोने 141 रुपयांनी स्वस्त होऊन प्रति 10 ग्राम सोन्याची किंमत 50,389 रुपये झाली आहे. तर चांदीची किंमत 129 रुपयांनी कमी होऊन चांदी आता प्रति किलो 64,229 रुपये इतकी झाली आहे. मागील काही महिन्यात सोन्याने नऊ महिन्यांच्या उच्चांकी पातळी गाठली होती. युक्रेन-रशिया तणावाचा प्रभावही जागतिक बाजारावर पडला आहे. ज्यामुळे सोन्या-चांदीचे दर वधारले होते. मात्र सराफा बाजारात वरच्या पातळीवरून नफा बुकींग केल्यामुळे आज बुधवारी घसरण दिसून येत असल्याचे सांगितले जात आहे.
प्रमुख भारतीय शहरांमध्ये सोने आणि चांदीच्या किमती
नवी दिल्लीत 22 कॅरेट सोन्याचा दर 46,250 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदीचा दर 64,400 रुपये प्रति किलो आहे.
मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा दर 46,250 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदीचा दर 64,400 रुपये प्रति किलो आहे.
कोलकातामध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 46,250 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदीचा दर 64,400 रुपये प्रति किलो आहे.
चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 47,620 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदीचा दर 69,100 रुपये प्रति किलो आहे.