कुटुंबातील चार जणांची हत्या


23/11/2022 16:16:46 PM   Sweta Mitra         5


दिल्लीतील पालम भागात एकाच कुटुंबातील चार जणांची हत्या करण्यात आली. एकाच कुटुंबातील चार जणांची हत्या झाल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी हत्येप्रकरणी आरोपी केशव (25) याला अटक केली आहे. केशवने आपल्या आई-वडील, आजी आणि बहिणीची हत्या केली आहे. या तरुणाला अंमली पदार्थांचे व्यसन असून त्यासाठी तो नातेवाइकांकडे पैशांची मागणी करत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. नकार दिल्याने तरुणाने त्यांची  निर्घृण हत्या केली.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस जेव्हा घरात गेले तेव्हा तिथे फक्त रक्तच सांडले होते. तरुणाने बहिणीची खोलीत हत्या केली, तिचा मृतदेह जमिनीवर पडला होता. खोलीतील बेडवर आजीचा मृतदेह आढळून आला. बाथरूममध्ये आई-वडिलांचे मृतदेह दिसत आहेत. घरात बेडरूमपासून बाथरूमपर्यंत रक्त पसरले आहे. आरोपी केशव (25) याने आजी दिवाणो देवी (75), वडील दिनेश (50), आई दर्शना आणि बहीण उर्वशी (18) यांची हत्या केली. आरोपी दारूच्या नशेत होता आणि घरच्यांकडे पैसे मागत असे. कुटुंबीयांनी पैसे देण्यास नकार दिल्याने त्याने कुटुंबीयांच्या हत्येचा कट रचला. रात्री साडेअकराच्या सुमारास वरच्या मजल्यावर ओरडण्याचा आवाज येत असल्याची माहिती मिळाली. पोलिस घटनास्थळी पोहोचले तेव्हा सर्वत्र रक्ताचा सडा पडला होता आणि चारही जण रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पालम पोलिसांनी केशवला अटक केली आहे.  
also read:
https://anmnewsmarathi.com/Home/GetNewsDetails?p=8014
https://anmnewsmarathi.com/Home/GetNewsDetails?p=8015
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  TAGS :              Four members family killed