आदित्य ठाकरे बुधवारी बिहार दौऱ्यावर


23/11/2022 16:21:44 PM   Sweta Mitra         13


युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे बुधवारी एक दिवसाच्या बिहारच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दरम्यान आदित्य ठाकरे बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची भेट घेणार आहेत. त्यांच्यासोबत शिवसेना नेते अनिल देसाई, खासदार प्रियांका चतुर्वेदी उपस्थित राहतील. आदित्य ठाकरे आणि तेजस्वी यादव यांची भेट दुपारी 3 वाजता होणार आहे. पक्षाने याबाबत एक परिपत्रक प्रसिद्ध करून ही माहिती दिली आहे. 
महाराष्ट्र महाविकास आघाडीचा प्रयोग करून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने एकत्र येऊन राज्यात सरकार स्थापन केली होती. मात्र शिवसेनेत फूट पडून ठाकरे आणि शिंदे असे दोन गट निर्माण झाले आणि मविआ सरकार कोसळे. याच्याच काही दिवसानंतर बिहारमध्ये नितीश कुमार यांनी भाजपची साथ सोडून आरजेडी सोबत हातमिळवणी केली आणि नवीन सरकार स्थापन झालं. या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असलेले तेजस्वी यादव आणि आदित्य ठाकरे यांची ही भेट मुंबईच्या येत्या महानगरपालिका निवडणुकीवर परिणामकारक ठरू शकते, अशी चर्चा आहे. याच कारण म्हणजे मुंबईत मोठ्या प्रमाणात उत्तर भारतीय नागरिक राहतात. मुंबईच्या पालिकेच्या अनेक जागांवर त्यांचं मत हे परिणामकारक ठरू शकतं.    
also read:
https://anmnewsmarathi.com/Home/GetNewsDetails?p=8015
https://anmnewsmarathi.com/Home/GetNewsDetails?p=8016
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  TAGS :              Aditya Thackeray visit Bihar Wednesday