महाराष्ट्रातील जिल्ह्यांत भूकंप


23/11/2022 16:23:44 PM   Sweta Mitra         323 नोव्हेंबर रोजी राज्यातील पालघर आणि नाशिकमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. नाशिक ला रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 3.6 इतकी मोजण्यात  आली .नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, पहाटे 04.04 च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. तर पालघर मध्ये भूकंपाचे धक्के जाणवले रिश्टर स्केलवर तीव्रता 3.4 इतकी मोजण्यात आली. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा मालमत्तेची हानी झाल्याची पुष्टी केलेली नाही.
बुधवारी पहाटे महाराष्ट्रातील नाशिक आणि पालघर जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले. सुदैवाने कोणतीही जण धन हानी झाली नाही. नाशिक का पहाटे 4वाजता भूकंपाचे धक्के5 किमी खोलीवर जमिनीखाली जाणवले. तर पालघरातील डहाणूच्या तलासरी तालुक्यात पहाटे 4वाजून 5 मिनिटावर भूकंपाचे धक्के जाणवले.
नाशिक, पालघरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवण्याआधी अहमदनगर जिल्ह्यातील अनेक तालुक्यात मंगळवारी रात्री नऊ ते साडेनऊ वाजेदरम्यान भूकंपसदृश्य सौम्य धक्के जाणवले. राहुरी, संगमनेर, श्रीरामपुर, कोपरगाव तालुक्यातील वारी कान्हेगाव व पंचक्रोशीमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. ही चर्चा रात्री सोशल मीडियाच्या माध्यमातून झाल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
also read:
https://anmnewsmarathi.com/Home/GetNewsDetails?p=8013
https://anmnewsmarathi.com/Home/GetNewsDetails?p=8017
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  TAGS :              Earthquake districts Maharashtra