25/11/2022 17:23:55 PM Sweta Mitra 26
नोव्हेंबर महिना संपत आला असून या वर्षातला 12 वा महिना आणि शेवटचा महिना म्हणजे डिसेंबर महिना सुरु व्हायला अवघे सहा दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे बँकांशी संबंधित महत्वाची कामं तुमची बाकी असतील तर ती येत्या काही दिवसात पूर्ण करुन घेणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. कारण डिसेंबर महिन्यामध्ये 13 दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे तुमची कामं आधीच पूर्ण करुन घ्या. डिसेंबर महिन्यात तुम्हाला बँकेशी संबंधित काही कामं करायची असतील तर तुम्हाला बँका कोणत्या दिवशी बंद राहणार आहेत हे जाणून घेणे खूपच गरजेचे आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेने डिसेंबर 2022 च्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. आरबीआयने सांगितल्याप्रमाणे, डिसेंबर महिन्यात 13 दिवस बँका बंद राहणार आहेत. ग्राहक आणि कर्मचाऱ्यांची सोय लक्षात घेऊन आरबीआय सुट्ट्यांची यादी अगोदर प्रसिद्ध करत असते. डिसेंबर महिन्यात बँकेत जाण्यापूर्वी तुम्ही बँकेच्या सुट्ट्यांची यादी जरुर बघायला हवी. नाही तर तुमचा वेळ वाया जाईल. डिसेंबर 2022 मध्ये बँकांना एकूण 13 दिवस सुट्ट्या असणार आहेत. आरबीआयच्या दिलेल्या सुट्ट्यांच्या यादीनुसार, डिसेंबर महिन्यात देशाच्या विविध भागांमध्ये विविध सण साजरे केले जातात या सणांच्या सुट्ट्या असणार आहेत. तसंच, दुसऱ्या आणि चौथ्या शनिवार आणि रविवारी या साप्ताहिक सुट्ट्या असतील. राष्ट्रीय स्तरावर डिसेंबरमध्ये 3, 4, 10, 11, 18, 24, 25 रोजी बँका एकाच वेळी बंद राहतील.