30/11/2022 16:31:31 PM Sweta Mitra 13
जागतिक तापमान वाढ थांबण्याचे नाव घेत नसल्याने होणाऱ्या हवामान बदल परिणाम जाणवू लागले आहेत. जगभरातीलच मानवजातीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकेल, अशा घटना घडू लागल्या आहेत. कोरोना व्हायरस महामारीने घातलेला धुमाकूळ आता कुठे कमी आलाआहे. तोवरच आता झोंबी व्हायरस डोके वर काढताना आढळतो आहे. संशोधकांच्या म्हणन्यासूनच एका 48,500 वर्षांपूर्वी गोठलेल्या तलावाखालून झोंबी नावाचा व्हायरस बाहेर पडत आहे.
युरोपियन संशोधकांनी रशियाच्या सायबेरिया प्रदेशातील पर्माफ्रॉस्टमधून गोळा केलेल्या प्राचीन नमुन्यांची तपासणी केली. या नमुन्यांमध्ये आढळलेल्या विषाणूंनी 13 नवीन रोगकारक पुनरुज्जीवित केले आहेत. जो विषाणू अथवा परिस्थिती अनेक रोगांचे कारण ठरते त्याला रोगकारक म्हणतात. झोंबी व्हायरस अशाच रोगकारकामधून आला आहे, असे ब्लुमबर्गचा अहवाल सांगतो. न्यूयॉर्क पोस्टच्या मते, झोम्बी व्हायरसचे पुनरुज्जीवन झाल्याचे आढळल्यानंतर फ्रेंच शास्त्रज्ञांनी आणखी एका साथीच्या रोगाची भीती व्यक्त केली आहे.