07/01/2023 18:36:35 PM Sweta Mitra 6
एअर इंडियाच्या विमानात सहप्रवाशी महिलेच्या अंगावर लघुशंका केलेल्या शंकर मिश्रा याच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत. पोलीस त्याचा शोध घेत असून तो फरार आहे त्यातच त्यांची कंपनी वेल्स फार्गोने त्याला नोकरीवरून काढले आहे.
मागील वर्षी २६ नोव्हेंबर रोजी एअर इंडियाच्या न्यूयॉर्क ते नवी दिल्ली येणाऱ्या विमानात दारूच्या नशेत सहप्रवाशी महिलेच्या अंगावर लघुशंका करणाऱ्या शंकर मिश्रा याच्या अडचणी वाढल्या आहेत. त्याची कंपनी वेल्स फार्गोने त्याला नोकरीवरून टर्मिनेट केले आहे.
गेल्या वर्षी २६ नोव्हेंबरला न्यूयॉर्क-दिल्ली फ्लाइटमध्ये एका मद्यधुंद व्यक्तीने बिझनेस क्लासमध्ये आपल्या सहप्रवाशावर लघुशंका केल्याचा आरोप आहे. महिला ज्येष्ठ नागरिक असून त्यांचे वय ७० वर्षांपेक्षा जास्त आहे. पीडितेने एअर इंडियाला दिलेल्या तक्रारीच्या आधारे दिल्ली पोलिसांनी बुधवारी आरोपीविरुद्ध एफआयआर नोंदवला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. पोलिसांनी आरोपी व्यक्तीकडे चौकशी केली असता असे आढळून आले की, शंकर मिश्रा हे अमेरिकन कंपनी वेल्स फार्गोच्या इंडिया चॅप्टरचे उपाध्यक्ष आहेत. मिश्रा हे मुंबईचे रहिवासी आहेत. आम्ही आमची टीम मुंबईतील त्यांच्या ओळखीच्या ठिकाणी पाठवली होती पण ते फरार आहेत. आमची टीम त्यांना शोधत आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.