08/01/2023 17:58:26 PM Sweta Mitra 10
'बिग बॉस मराठी' म्हटलं चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचते. मग पर्व कधी सुरु होणार? सदस्य कोण असणार? सिझनच घर कसं असेल? आणि बरंच काही... आता संपूर्ण महाराष्ट्र वाट बघत आहे ते म्हणजे या पर्वाचा महाविजेता कोण ठरणार याची. अखेर तो क्षण आला आहे. 100 दिवसांपूर्वी 16 सदस्यांसोबत या रोमांचक प्रवासाची सुरुवात झाली आणि आता घरात उरले आहेत टॉप पाच सदस्य. यात अपूर्वा नेमळेकर, अक्षय केळकर, अमृता धोंगडे, किरण माने आणि राखी सावंत या स्पर्धकांचा समावेश आहे.
'बिग बॉस मराठी'चं चौथं पर्वदेखील महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचलं आणि कानाकोपर्यात फक्त याच कार्यक्रमाची चर्चा सुरू झाली. आता या टॉप पाच स्पर्धकांमधून कोणता सदस्य ठरणार 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वाचा महाविजेता हे जाणून घेण्याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागली आहे. आज रविवारी 'बिग बॉस मराठी'च्या चौथाचा पर्वाचा महाअंतिम सोहळा 8 जानेवारी रोजी संध्या 7.00 वा. कलर्स मराठीवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.