विराट-इशानचा भन्नाट डान्स


13/01/2023 18:11:28 PM   Sweta Mitra         5भारतीय संघाने कोलकाता येथे झालेल्या दुसऱ्या वन डे सामन्यात ४ विकेट्स राखून विजय मिळवत ऑस्ट्रेलियाच्या वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबर केली मिळवला. या निकालासह भारताने श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. कुलदीप यादवने पुनरागमनाचा सामना गाजवला आणि मोहम्मद सिराजने त्याला साजेशी साथ दिली. फलंदाजीत लोकेश राहुलने संयमी खेळ करताना भारताचा विजय निश्चित केला. . दरम्यान, इडन गर्डनवर झालेल्या या सामन्यात विराट कोहली  व इशान किशन यांचा डान्स चर्चेला आला आहे. अनेकांना हा डान्स पाहून RRR चित्रपटातील नाटू नाटू या गाण्याची आठवण झाली. 
कुलदीप व मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. उम्रान मलिकने दोन विकेट्स घेत श्रीलंकेचा डाव ३९.४ षटकांत २१५ धावांवर गुंडाळला. अविष्का फर्नांडो ( २०), कुसल मेंडिस ( ३४) यांनी चांगला खेळ केला. पदार्पणवीर नुवानिदू फर्नांडोने अर्धशतक झळकावताना भारतासमोर आव्हानात्मक धावसंख्या उभ्या केल्या. प्रत्युत्तरात, रोहित शर्मा ( १७) व शुभमन गिल ( २१) यांना मोठी खेळी करता आली नाही. विराट कोहली ( ४) व श्रेयस अय्यर ( २८ ) हेही माघारी परतले.  लोकेश राहुल व हार्दिक पांड्या यांनी श्रीलंकेच्या सर्व मेहनतीवर पाणी फिरवले. या दोघांनी संयमी खेळ करताना ११९ चेंडूंत ७५ धावांची भागीदारी केली. हार्दिक ५३ चेंडूंत ३६ धावांवर माघारी परतला.
लोकेश १०३ चेंडूंत  ६ चौकारांसह ६४ धावांवर नाबाद राहिला, कुलदीपने नाबाद १० धावा केल्या. भारताने ४३.२ षटकांत ६ बाद २१९ धावा करून विजय मिळवला. भारताचा वन डे क्रिकेटमधील श्रीलंकेवरील हा ९५ वा विजय ठरला आणि वन डे क्रिकेटमध्ये एकाच प्रतिस्पर्धीविरोधात सर्वाधिक विजयाच्या ऑस्ट्रेलियाच्या ( वि. न्यूझीलंड) वर्ल्ड रेकॉर्डशी भारताने बरोबरी केली. 
also read:
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  TAGS :              ishan kishan indian cricket virat kohli samachar BreakingNews india newsupdates dailynews dailynewsupdate