13/01/2023 18:18:16 PM Sweta Mitra 4
'पान सिंह तोमर' चित्रपटाचे लेखक संजय चौहान यांचे वयाच्या ६२ व्या वर्षी निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. संजय चौहान यांनी १२ जानेवारीला मुंबईतील एका रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. संजय लिव्हर संबंधित आजाराने त्रस्त होते. त्यांचे मागे त्यांनीही पत्नी सरिता आणि मुलगी सारा असा परिवार आहे.
संजय चौहान यांनी अनेक चित्रपटांसाठी काम केले आहे. त्यांच्या कामाचे नेहमीच कौतुक झाले आहे. संजय चौहान 'पान सिंह तोमर' व्यतिरिक्त तिग्मांशू धूलियासह 'साहेब बीवी गँगस्टर' हा चित्रपट सुद्धा लिहिला आहे. 'आय एम कलाम' या चित्रपटासाठी त्यांना 'बेस्ट स्टोरी'साठी फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला आहे. 'मैने गांधी को नाही मारा' आणि 'धूप' हे काही त्यांच्या प्रसिद्ध चित्रपट आहेत.
मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये जन्मलेल्या संजय चौहानचे वडील रेल्वेत काम करत होते आणि त्यांची आई शिक्षिका होती. संजय चौहान यांनी दिल्लीतून पत्रकार म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. सोनी टीव्हीसाठी गुन्हेगारीवर आधारित मालिका 'भंवर' लिहिल्यानंतर ते 1990 मध्ये मुंबईत आले. आज दुपारी 12.30 वाजता ओशिवरा स्मशानभूमीत संजय चौहान यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार असल्याचे सांगितले जात आहे.