13/01/2023 18:21:16 PM Sweta Mitra 4
सिन्नर- शिर्डी महामार्गावर पाथरे शिवारातील ईशानेश्वर मंदिराच्या कमानीजवळ सकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. खासगी बसमध्ये एकूण ५० प्रवाशी असल्याची प्राथमिक माहिती आहे. तर, बसमधील दहा प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
सिन्नर शिर्डी महामार्गावर पाथेर गावच्या जवळ खासगी आराम बस आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन हा अपघात घडला आहे. ही धडक इतकी भीषण होती की दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला आहे. बसमधील अनेक प्रवाशी जखमी झाल्याची माहिती आहे. अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना सिन्नर आणि नाशिकमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, यात किती जण गंभीर जखमी व मृत्यू झाले आहेत याचा सविस्तर आकडा समजू शकलेला नाहीये. दरम्यान, प्रत्यक्षदर्शींना दिलेल्या माहितीनुसार १० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. मृत्यू झालेल्या प्रवाशांमध्ये सात महिला, एक पुरुष आणि दोन लहान मुले मृत्युमुखी पडल्याची प्राथमिक माहिती आहे. तर, सहा जणं गंभीर जखमी झाले आहेत.
अंबरनाथ, ठाणे, उल्हासनगर येथून साई भक्त शिर्डी येथे दर्शनाला जात असतानाच हा अपघात घडला आहे. उल्हासनगर येथून १५ बस साई दर्शनासाठी निघालेल्या होत्या त्यातील एका बसला हा भीषण अपघात झाला आहे.