18/01/2023 17:31:51 PM Sweta Mitra 8
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि त्यांची पत्नी अभिनेत्री जया बच्चन यांनी काल (17 जानेवारी) इंदूरच्या कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयाच्या लोकार्पण सोहळ्याला हजेरी लावली. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हे वर्च्युअली उपस्थित होते. नुकताच जया बच्चन यांचा इंदूर विमानतळावरील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जया बच्चन या फोटोग्राफर्सवर भडकल्या आहे, असं या व्हिडीओमध्ये दिसत आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, इंदूर विमानतळावर जया बच्चन यांचा फोटो काढण्याचा प्रयत्न एक फोटोग्राफर करत आहे. यावेळी जया बच्चन या फोटोग्राफरवर भडकल्या. जया बच्चन या त्या फोटोग्राफरला म्हणतात, 'प्लीज माझा फोटो काढू नका' नंतर त्या म्हणतात, 'तुला इंग्रजी येत नाही का?' ,'अशा लोकांना नोकरीवरुन काढून टाकलं पाहिजे', असंही जया बच्चन म्हणतात. या व्हायरल व्हिडीओला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. व्हिडीओला कमेंट करुन अनेक लोक जया बच्चन यांना ट्रोल करत आहेत.