भारतीय कुस्तीत खळबळ!


19/01/2023 17:15:21 PM   Sweta Mitra         8भारताचे आघाडीचे कुस्तीपटू बजरंग पुनिया, विनेश फोगट आणि साक्षी मलिक यांनी नवी दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलन केलं. कुस्तीपटूंनी भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष भाजप खासदर बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात धरणे आंदोलन सकाळपासून सुरु केलं होतं. विनेश फोगटनं बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले. विनेश फोगट हिनं "भारतीय कुस्ती संघाच्या अध्यक्षांनी महिला पैलवान आणि प्रशिक्षकांचं लैंगिक शोषण केलं आहे", असं म्हटलं. "मी आज हे बोलतेय पण उद्या जिवंत असेन की नाही हे माहिती नाही, माझ्यासोबत ज्या महिला पैलवान बसल्या आहेत त्यापैकी काही जणी देखील पीडित आहेत.आम्ही आमच्यासाठी लढत नसून कुस्ती वाचवण्यासाठी लढतोय", असं विनेश फोगट म्हणाली. लैंगिक शोषणाचा मोठा आरोप असून मी चौकशीला तयार असल्याचं बृजभूषण शरण सिंह म्हणाले.
विनेश फोगट हिनं बोलताना "भारतीय कुस्ती संघाच्या अध्यक्षांकडून मानसिकदृष्ट्या अनेकदा त्रास देण्यात आला. आत्महत्या करण्याचे विचार अनेकदा मनात आले होते. बृजभूषण शरण सिंह चार वेळा खासदार राहिले आहेत. ते शक्तिशाली आहेत. त्यांच्याविरोधात तक्रार होते त्यावेळी आम्हाला जिवे मारण्याची धमकी मिळते", असं म्हटलं.
बजरंग पुनियानं जोपर्यंत भारतीय कुस्ती संघाच्या अध्यक्षपदावरुन बृजभूषण शरण सिंह यांना हटवलं जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरु राहणार असल्याचं म्हटलं.
साक्षी मलिक हिनं नव्या कुस्तीपटूंच्या भविष्यासाठी भारतीय कुस्ती संघाच्या पदाधिकाऱ्यांना हटवलं पाहिजे, असं म्हटलं. आम्ही या प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री आणि पंतप्रधानांशी बोलण्यास तयार आहोत. या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, असं साक्षीनं म्हटलं.
also read:
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  TAGS :              Excitement Indian wrestling players